
अंकले ग्रामपंचायत तर्फे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत
“एक व्यक्ती – एक झाड” उपक्रम










अंकले ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या अंतर्गत गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत झाड लावण्याचा प्रेरणादायी उपक्रम पार पाडला.
आई आणि मुलांनी एकत्र झाड लावत निसर्गप्रेम, कर्तव्यभावना आणि संस्कार यांची जोड या उपक्रमातून दिसून आली.
झाडे लावणारे विद्यार्थी व मातांचे नावे:
धनश्री एडके आईचे नाव – संपदा एडके समीक्षा पुजारी मयुरेश नंदकुमार पोद्दार आईचे नाव – गीता नंदकुमार पोद्दार
अंकले ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचा उद्देश फक्त झाडे लावणे नसून लावलेल्या झाडांचे संगोपन, पाणी देणे, संरक्षण करणे आणि मोठे होईपर्यंत देखरेख करणे हा आहे.
गाव हिरवेगार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एक व्यक्ती – एक झाड
हिरवेगार अंकले – आपली सामूहिक जबाबदारी

