मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रचार व प्रसिद्धी प्रभात फेरी

अंकले ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी प्रसारासाठी आज गावामध्ये प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट सदस्या, विद्यालयातील विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

प्रभात फेरीदरम्यान ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, प्लास्टिक बंदी याबाबतचे घोषवाक्ये देत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना, उपक्रम व मोहिमा पोहोचविणे व त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे.

हिरवेगार, स्वच्छ, निरोगी आणि प्रगत अंकले निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करते.

समृद्ध पंचायत – समृद्ध गाव

आपला सहभाग – आपली प्रगती