
आज ग्रामपंचायत अंकले यांच्या वतीने महिला सभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या समस्या, गरजा तसेच गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, स्वयंरोजगार व बचत गट याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी आपल्या सूचना व मतं मोकळेपणाने मांडली.
ही महिला सभा महिलांचा सहभाग वाढवणारी आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी महिला, पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायत अंकले यांच्यावतीने मनःपूर्वक आभार.


Leave a Reply