Author: raj.gadade@gmail.com
-

महिला सभा संपन्न | ग्रामपंचायत अंकले
आज ग्रामपंचायत अंकले यांच्या वतीने महिला सभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या समस्या, गरजा तसेच गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, स्वयंरोजगार व बचत गट याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी आपल्या सूचना व मतं…
-

🏥 मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न 🩺
ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरात गावातील नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत टीमच्या सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले. ✅ सर्वसाधारण आरोग्य तपासणी✅ रक्तदाब / साखर तपासणी✅ औषध वितरण✅ आरोग्य जागृती सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨
